शाहरुखच्या ‘झिरो’चा टीझर लॉन्च

शाहरुखच्या या बहुप्रतीक्षित सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेत्री कतरिना कैफही मुख्य भूमिकेत आहेत.

शाहरुखच्या ‘झिरो’चा टीझर लॉन्च

मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानने आपल्या आगामी ‘झिरो’ सिनेमाचा टीझर लॉन्च केला आहे. ‘रांझना’ आणि ‘तनू वेड्स मनू’ यांसारखे सिनेमे बनवणाऱ्या आनंद एल. राय यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

शाहरुखच्या या बहुप्रतीक्षित सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेत्री कतरिना कैफही मुख्य भूमिकेत आहेत.

टीझरच्या एका मिनिटाच्य व्हिडीओत शाहरुख खान एका ठेंगण्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो. शिवाय तो मोहम्मद रफींच्या इस दीवाने दिल ने क्या जादू चलाया" या गाण्यावर नाचत असतो.त्यानंतर ‘झिरो’ हे सिनेमाचं नाव समोर येतं आणि त्यामागे “हम जिसके पीछे लग जाते हैं, लाइफ बना देते हैं” हा शाहरुखच्या आवाजातील डायलॉगही आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला आगामी सिनेमाची घोषणा करणार असल्याचे शाहरुखने 2 नोव्हेंबरला म्हणजे त्याच्या वाढदिवशी सांगितले होते.

शाहरुखने ट्विटरवर टीझर शेअर करताना म्हटले आहे की, “टिकटें लिए बैठें हैं लोग मेरी ज़िंदगी की, तमाशा भी पूरा होना चाहिए!"

शाहरुखचा ‘झिरो’ सिनेमा 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

टीझरचा व्हिडीओ :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: teaser released of shah rukh khans Zero latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV