सनी लियोनीचं लाडक्या लेकीला खास सरप्राईज!

डॅनियलने ट्विटरवर शनिवारी वाढदिवसाच्या तयारीचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

सनी लियोनीचं लाडक्या लेकीला खास सरप्राईज!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने दत्तक घेतलेली मुलगी निशा कौर वेबरचा दुसरा वाढदिवस धडाक्यात साजरा केला. सनीच्या घरात निशाचा हा पहिला वाढदिवस होता. सनी लियोनी आणि तिचा नवरा डॅनियन वेबरने यंदाच निशाला लातूरमधील आश्रमातून दत्तक घेतलं होतं.

डॅनियलने ट्विटरवर शनिवारी वाढदिवसाच्या तयारीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. "आमच्या मुलीला दुसऱ्या तिच्या वाढदिवसाला सरप्राईज देत आहोत. हे अनमोल आहे, लव्ह यू निशा कौर वेबर!," असं डॅनियलने व्हिडीओ शेअर करताना लिहिलं होतं.

https://twitter.com/DanielWeber99/status/919294190709719040

यानंतर सनीने डॅनियलचं ट्वीट करुन लिहिलं की, "आज मित्र आणि कुटुंबीयांना भेटून दिवस आनंदात गेला. आमची मुलगी आज दोन वर्षांची झाली होती. तुझ्यामुळे आमचं आयुष्य उजळलं. हॅप्पी बर्थडे निशा कौर वेबर."

सनी आणि डॅनियलने अमेरिकेत लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा केला. निशाच्या वाढदिवसासाठी डिस्ने लॅण्डमध्ये असल्याचं सनीने ट्वीटद्वारे सांगितलं.

https://twitter.com/SunnyLeone/status/918701532199006208

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV