सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चा ट्रेलर रिलीज

Tiger Zinda Hai Trailer - ‘टायगर जिंदा है’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सलमान खानने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चा ट्रेलर रिलीज

मुंबई: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या यशानंतर, आता ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘टायगर जिंदा है’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.  सलमान खानने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे.  या सिनेमात सलमान खान कतरिना कैफसोबत दिसणार आहे. यशराज फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बासने केलं असून हा चित्रपट 2017 मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार आहे. येत्या 22 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल.

या ट्रेलरमध्ये सलमानचे अनेक डायलॉग ऐकायला मिळतात. शिकार तो सभी करते है, लेकीन टायगर जैसी शिकार कोई नही कर सकता, असे भारदस्त डायलॉग या सिनेमात आहेत.

सलमानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 199 कोटी रुपये कमाई केली होती. या चित्रपटात सलमानसोबत कतरीना मुख्य भूमिकेत होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. या चित्रपटात सलमान खानला ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेचा एक एजंट दाखवण्यात आले होते.

त्याचाच पुढचा भाग म्हणून ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाकडे पाहिलं जात आहे.

‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर इथे पाहा

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tiger Zinda Hai Trailer, टायगर जिंदा है ट्रेलर, Salman Khan Katrina Kaif
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV