सलमानच्या 'टायगर'ला सुरक्षा द्या, मनसेच्या गुंडांना रोखा: संजय निरुपम

येत्या शुक्रवारी 'गच्ची' आणि 'देवा' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर त्यांच्यासमोर हिंदीत उभा ठाकतोय सलमान खानचा 'टायगर जिंदा है'.

सलमानच्या 'टायगर'ला सुरक्षा द्या, मनसेच्या गुंडांना रोखा: संजय निरुपम

मुंबई: मराठी विरुद्ध हिंदी सिनेमा वादात आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतली आहे. संजय निरुपम यांनी थेट थिएटर मालकांची बाजू घेत पुन्हा मनसे विरोधात दंड थोपटले आहेत.

संजय निरुपम यांनी ट्विट करुन मनसेला पुन्हा ललकारलं आहे.

“मराठी सिनेमाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, मात्र त्याच्या नावे मनसेची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांनी ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सुरक्षा द्यावी. तसंच मनसेच्या गुंडांविरोधात लढण्यासाठी थिएटर मालकांना बाऊन्सर्स/ सुरक्षा रक्षक ठेवण्याची परवानगी द्यावी”, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.नेमका काय आहे वाद?

येत्या शुक्रवारी 'गच्ची' आणि 'देवा' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर त्यांच्यासमोर हिंदीत उभा ठाकतोय सलमान खानचा 'टायगर जिंदा है'. बऱ्याच दिवसांनी हिंदीत बिग बजेट सिनेमा येत असल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही कंबर कसली आहे.

मात्र सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमामुळे मराठी चित्रपट देवा आणि गच्ची यांना थिएटर्स मिळणं कठीण झालं आहे.

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे प्रत्येक स्क्रिनवर 5 खेळ लावा, असा मेल यशराज फिल्म्सने सर्व थिएटर मालकांना केला आहे. त्यामुळे  देवा आणि गच्ची सारख्या मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देवाची मनसेकडे धाव

या प्रकारामुळे ‘देवा’च्या निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतल्यानंतर मनसेने देवाला जागा देण्यास थिएटर मालकांना बजावलं आहे. ‘देवा’च्या टीमने मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली.

यानंतर देवा या मराठी चित्रपटाला थिएटर न मिळाल्यास मनसे स्टाईनने आंदोलनाचा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

नितेश राणेंचा इशारा

दरम्यान, या वादात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली.

महाराष्ट्रात ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल, तर ते थिएटरर्स ना कुठलाच टायगर वाचू शकणार नाही!!  असा इशारा त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिला आहे.

महाराष्ट्र मध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असंही त्यांनी निक्षून सांगितलंय.

संजय राऊत

"देवा"चं काय. प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे. मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे., असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

 

संबंधित बातम्या

'टायगर'विरोधात 'देवा' राज ठाकरेंच्या दरबारात

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tiger Zinda Hai vs Marathi film Deva, Gacchi : Sanjay Nirupams tweet supporting theater owners
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV