'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई

शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा या सिनेमाला आणखी फायदा होणार आहे. त्यामुळे अक्षय कुमारचा हा या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरु शकतो.

'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा सामाजिक विषयावरील सिनेमा 'टॉयलेट एक प्रेम कथा'ला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग मिळाली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/896262212183932929

शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यादिनाच्या सुट्टीमुळे हा सिनेमा आणखी कमाई करणार आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा अक्षय कुमारचा हा या वर्षातील दुसरा सिनेमा ठरला.

यापूर्वी अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी 2 ने पहिल्या दिवशी 13.20 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाने हा आकडा गाठला नाही. या सिनेमाला समीक्षकांकडूनही दाद देण्यात आली आहे.

टॉयलेट एक प्रेम कथा हा सामाजिक विषयावरील सिनेमा आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV