'अॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन'... केजरीवालांवरील सिनेमाचा ट्रेलर रिलीज

खुशबू रांका आणि विनय शुक्ला यांनी दिग्दर्शित केलेला हा नॉन-फिक्शनल पॉलिटिकल सिनेमा आहे.

'अॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन'... केजरीवालांवरील सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'अॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन' असे या सिनेमाचं नाव आहे.

खुशबू रांका आणि विनय शुक्ला यांनी दिग्दर्शित केलेला हा नॉन-फिक्शनल पॉलिटिकल सिनेमा आहे.

सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय नेता आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास या सिनेमातून मांडण्यात आला आहे. स्वत: अरविंद केजरीवाल, तसेच योगेंद्र यादव, शीला दीक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केजरीवालांचे अनेक सहकारीही या नॉन-फिक्शनल सिनेमात दिसतात.

"अॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन हा सिनेमा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2016 मध्ये पाहिला. मला वाटतं, मार्शल करीच्या 'स्ट्रीट फाईट'नंतर राजकीय विषयावरील सर्वोत्तम डॉक्युमेंट्री आहे.", असे व्हॉईस डॉक्युमेंट्री फिल्म्सचे निर्माते जेसन मोजिका यांनी म्हटले.

या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला होता. सिनेमाच्या प्रदर्शनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याचे आदेश निर्मात्यांना देण्यात आले होते. त्यानंतर अखेर सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला प्रदर्शित करण्यास परवानगी दिली.

येत्या 17 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाहा सिनेमाचा ट्रेलर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Trailer of An Insignificant Man released latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV