बॉलिवूडमधील 'या' सेलिब्रेटीच्या सल्ल्याने तुषार कपूर सिंगल पेरेंट

'बाबा म्हणाले की लोक चार दिवस काहीतरी बोलतील आणि मग गप्प बसतील. तू कुठल्याच गोष्टीची काळजी नको करुस. एकताने सर्वाधिक सपोर्ट केला' असं तुषार सांगतो.

बॉलिवूडमधील 'या' सेलिब्रेटीच्या सल्ल्याने तुषार कपूर सिंगल पेरेंट

मुंबई : सिंगल पेरेंट झालेला तुषार कपूर हा बॉलिवूडमधला पहिला अभिनेता ठरला आहे. सरोगसीच्या माध्यमातून तुषारने 'लक्ष्य'ला जन्म दिला. एकेरी पालकत्वाचा निर्णय आपण दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सल्ल्यानंतर घेतल्याचं तुषार कपूरने सांगितलं.

'इतका मोठा निर्णय घेणं कठीण होतं. मनात अनेक शंका-कुशंका होत्या. लोक काय म्हणतील हा प्रश्न होताच. एकदा फ्लाईटमध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी भेट झाली. त्यांनी विचारलं, लग्नाबाबत काय विचार आहे. मी म्हटलं, लग्न तर ठरत नाहीये. अरेंज मॅरेज करायचं नाही आणि प्रेम तर जुळत नाही.' असं उत्तर दिल्याचं तुषारने सांगितलं.

'लग्न नाही केलंस, तरी पिता होऊ शकतोस, असं प्रकाश झा यांनी सुचवलं. त्यांनीही सिंगल पेरेंट म्हणून एक मुलगी दत्तक घेतली आहे. ती आता मोठी झाली असून आनंदात आहे. त्यांनी मला एका कुटुंबाचा नंबर दिला. मी त्यांची भेट घेऊन माहिती घेतली. मी माझ्या घरी याविषयी सांगितलं, तेव्हा सर्वांनीच पाठिंबा दिला.' असं तुषार म्हणाला.

तुषार कपूर खऱ्याखुऱ्या आयुष्यात लग्नाआधीच बाबा


'बाबा म्हणाले की लोक चार दिवस काहीतरी बोलतील आणि मग गप्प बसतील. तू कुठल्याच गोष्टीची काळजी नको करुस. एकताने सर्वाधिक सपोर्ट केला' असं तुषार सांगतो.

तुषार शूटिंगला जाताना लक्ष्यला सोबत घेऊन जातो. मात्र सेटवर नाही, तर त्या शहरात नेतो. सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्याचं पालनपोषण व्हावं, अशी तुषारची इच्छा आहे.

आतापर्यंत सुष्मिता सेन, रविना टंडन, नीना गुप्ता यासारख्या अभिनेत्री सिंगल मदर झाल्याचं उदाहरण होतं. तुषार हा सिंगल फादर होणारा पहिलाच अभिनेता ठरला. त्यानंतर करण जोहरनेही सरोगसीतून जुळ्या मुलांना जन्म दिला.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tussar Kapoor became father after advice given by Prakash Jha latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV