उर्मिला आणि आदिनाथ कोठारेला कन्यारत्न!

अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या घरी गोंडस चिमुकलीचं आगमन झालं आहे.

उर्मिला आणि आदिनाथ कोठारेला कन्यारत्न!

मुंबई : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या घरी गोंडस चिमुकलीचं आगमन झालं आहे. बाळाच्या आगमनाने कोठारे कुटुंबात सध्या प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. उर्मिलानं मुलीला जन्म दिल्याची बातमी आदिनाथनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली. उर्मिला आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे.

 दरम्यान, उर्मिला तिच्या गरोदरपणात सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत सतत संपर्कात होती. योगा करतानाचे अनेक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

'शुभमंगल सावधान' या सिनेमाच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिलाची पहिल्यांदा ओळख झाली होती. या ओळखीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झालं आणि  २० डिसेंबर २०११ रोजी दोघंही विवाहबंधनात अडकले होते.

शुभमंगल सावधान या सिनेमाचे दिग्दर्शक महेश कोठारे हे होते. तर आदिनाथ या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक होता.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: urmila and adinath kothare blessed with baby girl latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV