वरुण धवन यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार

अखेर वरुणने नताशाचं म्हणणं ऐकलं. त्याने आई-वडिलांच्या घराजवळच नवं घर घेतलं आहे.

वरुण धवन यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार

मुंबई : अभिनेता वरुण धवनसाठी नवं वर्ष खूपच स्पेशल असणार आहे. कारण या वर्षी तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गर्लफ्रेण्ड नताशा दलालसोबत तो लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

फॅशन डिझायनर नताशा दलाल आणि त्याच्या नात्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होती. मे किंवा जून महिन्यात दोघे बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे.

वरुण धवनने नुकतंच आई-वडिलांचं घर सोडून स्वत:चं घर घेतलं आहे. खरंतर वरुणला आई-वडिलांसोबतच राहायचं होतं. पण लग्नानंतर वेगळ्या घरात राहण्याची नताशाची इच्छा होती. यावरुनच दोघांमध्ये वादही झाले होते.

अखेर वरुणने नताशाचं म्हणणं ऐकलं. त्याने आई-वडिलांच्या घराजवळच नवं घर घेतलं आहे.

वरुण लवकरच सुजीत सरकारच्या 'ऑक्टोबर' सिनेमात दिसणार आहे. सध्या तो 'सुई-धागा- मेड इन इंडिया'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्यासोबत अनुष्का शर्मा झळकणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Varun Dhawan to tie knot with alleged girlfriend Natasha Dalal soon
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV