तीन दिवसांत 'जुडवा 2'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

तीन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत ‘जुडवा-2’ ने या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.

By: | Last Updated: > Monday, 2 October 2017 1:48 PM
Varun Dhawan’s Judwaa 2 rules box office, day 3 collection

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या ‘जुडवा-2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग विकेण्डला चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. तीन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत ‘जुडवा-2’ ने या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.

‘जुडवा-2’ ने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत 59 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात हा चित्रपट 3500 थिएटरमध्ये रिलीज झाला होता.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर सिनेमाच्या कमाईची माहिती दिली आहे. “पहिल्या दिवशी सिनेमाने 16.10 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 20.55 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 22.60 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे सिनेमाने तीन दिवसात एकूण 59.25 कोटींची कमाई केली आहे,”असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलं आहे. यासोबतच विश्लेषकांनी हा सिनेमा सुपरहिट असल्याचं जाहीर केलं आहे.

प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून वरुण धवन फारच खूश आहे. धवनने रविवारी ट्वीट केला होता की, “जुडवा-2’ डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेला 44वा चित्रपट आहे.  कलाकार म्हणून मी फार आनंदी आहे. शिवाय मुलगा म्हणून मला अतिशय अभिमान वाटतोय. त्यांना आपल्या प्रेक्षकांची नस माहित आहे आणि त्यांचे आभारी आहेत.”

‘जुडवा-2’ हा 1997 मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘जुडवा’चा रिमेक आहे. हा चित्रपट वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शिक केला होता. चित्रपटात वरुण धवन डबल रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Varun Dhawan’s Judwaa 2 rules box office, day 3 collection
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी

करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके
करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके

मुंबई : सोशल मीडियावर असंबद्ध बडबड करण्यासाठी प्रसिद्ध असलेला

शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन
शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन

मुंबई : सिनेनिर्माते लेख टंडन यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं.

अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री
अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री

पुणे : एफटीआयआयचे नुतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये

धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?
धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?

मुंबई : बॉलिवूडमधील अफेअर्सची चर्चा अक्षरशः न संपणारी आहे. जुळलेली

आमीरची ऑफर कोहलीने नाकारली
आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार

....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली
....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार