ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक टॉम अल्टर यांचं निधन

ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचं कर्करोगानं निधन झालं आहे.

By: | Last Updated: > Saturday, 30 September 2017 7:46 AM
veteran film and stage actor tom alter passed away due to cancer latest marathi news update

मुंबई : ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचं कर्करोगानं शुक्रवारी रात्री निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. अल्टर यांना त्वचेचा कॅन्सर झाला होता आणि तो चौथ्या स्टेजला पोहचला होता. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॉम अल्टर यांनी वीर-झारा, भेजा फ्राय, विरुद्ध, अलग, बोस, यासारख्या तीनशेहून अधिक चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. जुनून, शक्तिमान, जबान संभालके यासारख्या टीव्ही मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या आहेत. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही अल्टर झळकले होते. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं.

80 च्या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिता केली असून भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार ठरले होते. अल्टर यांनी तीन पुस्तकांचं लेखनही केलं.

कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 2008 मध्ये टॉम अल्टर यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांची कर्करोगाशी झुंज

टॉम अल्टर यांचा अल्पपरिचय

1950 मध्ये टॉम अल्टर यांचा मसूरीमध्ये जन्म झाला. अमेरिकन वंशाचे टॉम भारतात जन्मणारी त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी होते. त्यांचं शालेय शिक्षण वूडस्टॉक स्कूलमध्ये झालं, त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी येल विद्यापीठात गेले. 1970 नंतर ते पुन्हा भारतात आले.

पुण्यातील एफटीआयआय मध्ये त्यांना 1972 मध्ये प्रवेश मिळाला. उत्तर भारतातील 800 जणांमधून केवळ 3 विद्यार्थ्यांना निवडण्यात आलं, ज्यात अल्टर यांचा समावेश होता.

त्यांनी अभिनयामध्ये डिप्लोमा केला ज्यात त्यांना सुवर्णपदकानं गौरवण्यात आलं.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:veteran film and stage actor tom alter passed away due to cancer latest marathi news update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार
काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार

मुंबई : ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमातील शाहरुख आणि काजोलच्या मुलाची

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश
दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीनं दिवाळीनिमित्त आपल्या चाहत्यांना एक

ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप
ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप

मुंबई : ट्विटरवर बॉम्ब फोडणारा अभिनेता कमाल खानलाच ट्विटरने दिवाळी

'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर
'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर

सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला

'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा
'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा

सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी