श्रीदेवीचं पार्थिव पाहताच विद्या बालनला अश्रू अनावर

श्रीदेवीचं पार्थिव पाहताच अभिनेत्री विद्या बालन स्वत:ला आवरु शकली नाही आणि तिला तिथेच रडू कोसळलं.

श्रीदेवीचं पार्थिव पाहताच विद्या बालनला अश्रू अनावर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी हिच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याआधी तिचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींनी तिथं जाऊन तिला श्रद्धांजली अर्पण केली.

VIDYA 1

यावेळी अभिनेत्री विद्या बालनने देखील अंत्यदर्शन घेतलं. पण श्रीदेवीचं पार्थिव पाहताच तिला प्रचंड रडू कोसळलं. त्यावेळी तिचा पती सिद्धार्थ रॉय-कपूरने तिला सांभाळलं. त्यानंतर सोनम कपूरनं थोडं बाजूला नेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, श्रीदेवीला अंत्यदर्शनासाठी नववधूप्रमाणे सजवण्यात आलं आहे. तिला लाल बनारसी साडी परिधान करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजेपासूनच अनेक सेलिब्रिटींनी श्रीदेवीच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

VIDYA 2

दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. साडेचार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान पोलीस आणि एसआरपीएफनं कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. काल रात्री म्हणजे तब्बल 72 तासानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी दिग्गज नेत्यांसह, अख्खं बॉलिवूड आणि टॉलिवूडही लोटल्याचं दिसतं आहे.

संबंधित बातम्या :

श्रीदेवी मद्यसेवन करत नव्हती, ही हत्या आहे : सुब्रमण्यम स्वामी

श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन

श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी

श्रीदेवींच्या मृत्यूने धक्का, मला जगावंसं वाटत नाहीय : राखी सावंत

श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी?

गूगल सर्चमध्ये काल दिवसभरात ‘श्रीदेवी’ टॉप

श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात दारुचे अंश आढळले

नवा दावा – श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!

श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर

‘श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या’, खलीज टाइम्सचा दावा 

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन 

अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत 

नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये…

श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं

‘रुप की रानी’ श्रीदेवी यांची कारकीर्द

लेकीची बॉलिवूडमधली ‘धडक’ पाहण्यापूर्वी ‘मॉम’ची एक्झिट

दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो

बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: vidya balan got emotional at sridevi condolence meet latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV