देशभक्ती कुणावरही थोपवली जाऊ शकत नाही : विद्या बालन

'माझं वैयक्तिक मत असं आहे की, सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवलं जाऊ नये. देशभक्ती कुणावरही थोपवली जाऊ शकत नाहीत.'

देशभक्ती कुणावरही थोपवली जाऊ शकत नाही : विद्या बालन

मुंबई : सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवलं जाऊ की नये याबाबत अनेक मतं आतापर्यंत पाहायला मिळाली आहेत. आता अभिनेत्री विद्या बालननं देखील याबाबत आपलं मत मांडलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना तिनं याबाबत आपलं मत व्यक्त केलं.

'मला वाटत नाही की, सिनेमाआधी राष्ट्रगीत वाजवलं जावं. आपण शाळेत नाहीत, जिथे तुम्ही दिवसाची सुरुवात राष्ट्रगीतापासून करता. 'माझं वैयक्तिक मत असं आहे की, सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवलं जाऊ नये. देशभक्ती कुणावरही थोपवली जाऊ शकत नाहीत.' असं स्पष्ट मत तिनं  यावेळी मांडलं.

'पण माझ्या देशावर माझं प्रचंड प्रेम आहे. देशाच्या सुरक्षेसाठी मी वाटेत ते करु शकते.' असं सांगायलाही ती यावेळी विसरली नाही.

‘दरम्यान, कुठेही राष्ट्रगीत सुरु असलं तर मी तात्काळ उभी राहते.’ असंही विद्या यावेळी म्हणाली.

विद्या बालन सध्या आपला आगामी सिनेमा 'तुम्हारी सुलु'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 17 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: vidya balan statement on national anthem controversy
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV