व्हायरल सत्य : धबधब्याजवळ नाचताना रिंकू जोरदार पडली?

धबधब्याजवळ निसरड्या दगडांवर शूटिंग सुरु असताना एक तरुणी पडल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

By: | Last Updated: > Thursday, 9 November 2017 7:29 PM
Viral Satya : Sairat Fame Archie Rinku Rajguru allegedly falls during shooting at waterfall latest update

मुंबई : ‘सैराट’ फेम आर्ची अर्थात अभिनेत्री राजगुरु धबधब्यावर शूटिंग करताना पडली, अशा कॅप्शनसह एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकूच्या वडिलांनी मात्र ती अभिनेत्री आपली मुलगी नसल्याचा दावा केला आहे.

धबधब्याजवळ निसरड्या दगडांवर शूटिंग सुरु असताना एक तरुणी पडल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. डान्स करत असताना संबंधित तरुणी पडून दगडांवर जोरदार आपटली, मात्र तिला फारशी दुखापत झालेली नसावी. चित्रीकरण स्थळी उपस्थित असलेले क्रू तात्काळ तिच्या मदतीसाठी धावले.

व्हिडिओत पडलेली अभिनेत्री ही रिंकू राजगुरु असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा व्हिडिओ तिच्या ‘मनसु मल्लिगे’ या कन्नड सिनेमाचा असल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

दरम्यान, व्हिडिओत दिसणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु नसल्याचा दावा रिंकूचे वडील महादेव राजगुरु यांनी ‘माझा’शी बोलताना केला आहे.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरु चित्रपटात पदार्पण केलं. एकाच चित्रपटातून तिला अमाप लोकप्रियता तर मिळालीच, परंतु तिने राष्ट्रीय पुरस्कारावरही नाव कोरलं.

रिंकूचे आई-वडीलही लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत. एक मराठा लाख मराठा चित्रपटातून ते मोठ्या पडद्यावर एन्ट्री करत आहेत.

पाहा व्हिडिओ :

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Viral Satya : Sairat Fame Archie Rinku Rajguru allegedly falls during shooting at waterfall latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!
'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा...

मुंबई: गोव्यातील 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून

'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह
'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

जयपूर : ‘पद्मावती’च्या विरोधाने आता हिंसक रुप घेतलं आहे.

...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!
...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!

मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर

चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं
चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत

फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर

पणजी : ‘पद्मावती’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेल्या वादात

संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा
संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

पणजी (गोवा) : संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

जयपूर : ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं

मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी
मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी

'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य
'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य

चंदीगड : ‘पद्मावती’ सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु