विराट-अनुष्काचं 'इकोफ्रेण्डली' रिसेप्शन कार्ड!

21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत विराट आणि अनुष्काच्या लग्नाचं रिसेप्शन आहे.

विराट-अनुष्काचं 'इकोफ्रेण्डली' रिसेप्शन कार्ड!

मुंबई : इटलीत झालेल्या विराट-अनुष्काच्या लग्नानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकेचा एक फोटो दिग्दर्शक महेश भट यांनी शेअर केला आहे.

सामान्यत: सेलिब्रिटी आपल्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेत काहीतरी खास आणि अनोखं करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये ड्रायफ्रूट्स, वाईनपासून जगभरातील वेगवेगळे गिफ्ट्सही दिले जातात. मात्र विरुष्काच्या या आमंत्रण पत्रिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनुष्काने त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या इकोफ्रेण्डली पत्रिकेची निवड केली आहे. या पत्रिकेसोबत एक रोपटं पाहुण्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश विरुष्काने या पत्रिकेच्या माध्यमातून दिला आहे.

https://twitter.com/MaheshNBhatt/status/940952695430561792

यापूर्वी दिल्लीच्या रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकेची झलकही सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. पण मुंबईतील रिसेप्शन आमंत्रण पत्रिकेद्वारे विरुष्काने त्यांच्या अंदाजात खास संदेश दिला आहे. काही महिन्यांपूर्वी अनुष्का आणि विराटने श्रीलंकेत एक रोपटं लावलं होतं. याशिवाय अनुष्का वृक्षारोपण करत असते. याचे फोटोही ती शेअर करते.

दरम्यान, विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबरला इटलीतील टस्कनी इथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं असलं तरी भारतात ग्रॅण्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत विराट आणि अनुष्काच्या लग्नाचं रिसेप्शन आहे.

संबंधित बातम्या

'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं

विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!

विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती?

पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा

VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!

विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ

दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन

विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Virat-Anushka’s Eco-friendly reception card
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV