आम्ही ‘पब्लिक फिगर’ आहोत, ‘पब्लिक प्रॉपर्टी’ नाही : विद्या बालन

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Wednesday, 15 March 2017 11:49 AM
आम्ही ‘पब्लिक फिगर’ आहोत, ‘पब्लिक प्रॉपर्टी’ नाही : विद्या बालन

कोलकाता : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत एका चाहत्याने कोलकात्यातील डमडम विमानतळावर गैरवर्तन केलं. सेल्फी घेताना चाहत्याने विद्याच्या परवानगीविना तिला मिठी मारुन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.

विद्याने चाहत्याला दूर राहण्यास सांगितले. शिवाय, विद्याच्या मॅनेजरनेही चाहत्याला बाजूला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विद्या आणि तिच्या मॅनेजरकडे दुर्लक्ष करत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत राहिला.

अखेर संतापलेल्या विद्याने चाहत्याला धक्का दिला आणि बाजूला सारून निघून गेली.

या संपूर्ण घटनेनंतर स्पॉटबॉयशी बोलताना विद्या म्हणाली, “जर कुणी अज्ञात व्यक्ती तुम्हाला स्पर्श करत असेल, मग पुरुष असो वा स्त्री, तर अनकम्फर्टेबल जाणवू लागतं. कारण ती व्यक्ती तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करत असते. आम्ही पब्लिक फिगर आहोत, पब्लिक प्रॉपर्टी नाही.”

आपल्या आगामी ‘बेगम जान’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्या बालन कोलकात्यात होती. यावेळी विद्यासोबत ‘बेगम जान’चे निर्माते आणि दिग्दर्शकही होते.

First Published: Wednesday, 15 March 2017 11:46 AM

Related Stories

'पद्मावती'च्या सेटवर सांगलीच्या तीन युवकांचा मद्यप्राशन करुन धिंगाणा
'पद्मावती'च्या सेटवर सांगलीच्या तीन युवकांचा मद्यप्राशन करुन...

कोल्हापूर: दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या

श्रद्धा-अर्जुनच्या 'हाफ गर्लफ्रेण्ड'चा फर्स्ट लूक
श्रद्धा-अर्जुनच्या 'हाफ गर्लफ्रेण्ड'चा फर्स्ट लूक

मुंबई : श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या ‘हाफ

ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट
ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

ठाणे : अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी

दिल्लीतील तरुणीचा अक्षय कुमारला धोबीपछाड !
दिल्लीतील तरुणीचा अक्षय कुमारला धोबीपछाड !

नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार सध्या ‘नाम

विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला
विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला

मुंबई : दुखापतीमुळे आराम करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने धर्मशाला

रणबीर कपूरचं गौरी खानला इमोशनल पत्र
रणबीर कपूरचं गौरी खानला इमोशनल पत्र

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचं घर त्याची पत्नी गौरीने स्वत:च्या

राम गोपाल वर्माकडून योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधानांशी तुलना
राम गोपाल वर्माकडून योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधानांशी तुलना

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमीच

ट्विंकल खन्नाचा योगी आदित्यनाथ यांना अजब सल्ला
ट्विंकल खन्नाचा योगी आदित्यनाथ यांना अजब सल्ला

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल

केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस
केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस

मुबंई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना