'सैराट'च्या गाण्यांची हवा हिंदीत, 'धडक'मध्येही 'झिंगाट'

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान 'धडक'मधील या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन करणार आहे.

'सैराट'च्या गाण्यांची हवा हिंदीत, 'धडक'मध्येही 'झिंगाट'

मुंबई : 'उरात होतंय धडधड लाली गालावर आली...' हे शब्द ऐकून मराठीच नाही, तर तमाम देशभरातील किंबहुना जगभरातील कुठल्याही भाषिक प्रेक्षकांची पावलं थिरकतात. 'सैराट' चित्रपटातला हा पॉप्युलर डान्स नंबर आता हिंदीत ऐकायला मिळणार आहे. 'सैराट'चा अधिकृत रिमेक असलेल्या करण जोहरच्या आगामी 'धडक' चित्रपटात 'झिंग झिंग झिंगाट'चं हिंदी व्हर्जन दिसणार आहे.

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान 'धडक'मधील या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे झिंगाटचं नवं रुपडं पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

अजय-अतुल यांनी सैराटमधील गाण्यांना संगीत दिलं होतं. यापूर्वी अजय-अतुलच्या 'कोंबडी'च्या चालीवर 'चिकनी चमेली' हे गाणं हिंदीत गाजलं आहे. त्यामुळे 'झिंगाट'चं हिंदी व्हर्जन कसं असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. धडक 20 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.

संबंधित बातम्या :


‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात, पहिल्या शॉटचे फोटो समोर


'सैराट'च्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच, सिनेमाचं नाव...


श्रीदेवीची मुलगी हिंदी 'सैराट'मध्ये 'आर्ची'च्या भूमिकेत?


हिंदी सैराटचं कास्टिंग झालं, जान्हवी 'आर्ची', परशा कोण?


सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Zingaat song from Sairat to be featured in Karan Johar’s hindi remake Dhadak latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV