कल्याणमध्ये ट्रकखाली चिरडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

जिथे हा अपघात झाला, तिथे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून रस्त्याचं काम सुरू असून, त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

कल्याणमध्ये ट्रकखाली चिरडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

कल्याण : सायकलवरुन क्लासला निघालेल्या एका 11 वर्षीय मुलाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. कल्याणमधील रामबाग भागात ही हृदयद्रावक घटना घडली. जेसलीन कुट्टी असं 11 वर्षीय मुलाचं नाव आहे.

लुर्ड्स शाळेत सहावीत शिकणारा जेसलीन काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सायकलवरुन क्लासला जाण्यासाठी निघाला. मात्र कर्णिक रोडवर घराच्या चौकातच तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला.

जिथे हा अपघात झाला, तिथे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून रस्त्याचं काम सुरू असून, त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

यापूर्वीही याच ठिकाणी एका मुलाचा अपघात झाला होता. विशेष म्हणजे केडीएमसीचे आयुक्त पी. वेलारासू यांचा कमिश्नर बंगलाही याच रस्त्यावर असून, तरीही त्यांचं या रस्त्याच्या कामाच्या संथ गतीकडे दुर्लक्ष होत असल्याने स्वतः महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 11 year boy killed in road accident
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV