कर्जतच्या जंगलात हरवलेल्या 17 गिर्यारोहकांची सुखरुप सुटका

सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या 17 गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे. पाच तासांच्या शोधमोहीमेनंतर जंगलात हरवलेल्या गिर्यारोहकांना शोधण्यात पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना यश आलं.

कर्जतच्या जंगलात हरवलेल्या 17 गिर्यारोहकांची सुखरुप सुटका

रायगड : कर्जत नजीकच्या सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या 17 गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे. पाच तासांच्या शोधमोहीमेनंतर जंगलात हरवलेल्या गिर्यारोहकांना शोधण्यात पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना यश आलं. या गिर्यारोहकांच्या ग्रुपमध्ये सहा महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे.

पर्यटन' आणि 'गिर्यारोहण' हे आजच्या तरुणपिढीचे आकर्षण झाले आहे. शनिवारी सकाळी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, बोरीवली, डोंबिवली परिसरातील 17 गिर्यारोहक सोनगिरी किल्ल्यावर गेले होते. या गिर्यारोहकांनी संध्याकाळच्या सुमारास अवळस मार्गे परतीचा प्रवास सुरु केला.

पण, परतीच्या मार्गावर रस्ता न मिळाल्याने हे सर्व गिर्यारोहक सोनगिरी जंगलातच हरवले. वाट चुकल्याचे लक्षात येताच ग्रुपमधील काही जणांना पोलीस कंट्रोलरुमला संपर्क साधून, याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले.

सुमारे पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर या वाट हरविलेल्या गिर्यारोहकांचा शोधण्यात पोलीस आणि ग्रामस्थांना यश आले. या गिर्यारोहकामध्ये सहा महिला व अकरा तरुणांचा समावेश आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 17 missing trackers found in Karjat forest
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV