बॉम्बस्फोट केले मुंबईत, शिक्षा पोर्तुगालच्या नियमाने, अबू सालेमच्या जन्मठेपेची गुंतागुंत!

या खटल्यात सर्वाचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे अबू सालेमकडे. अबू सालेमला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सीबीआयने केली होती.

बॉम्बस्फोट केले मुंबईत, शिक्षा पोर्तुगालच्या नियमाने, अबू सालेमच्या जन्मठेपेची गुंतागुंत!

मुंबई: 12 मार्च 1993 ला मुंबईला रक्तरंजीत करणाऱ्या कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह त्याच्या साथीदारांना न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. विशेष टाडा न्यायालयाने मुंबईच्या मारेकऱ्यांना शिक्षा ठोठावली.

या खटल्यात सर्वाचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे अबू सालेमकडे. अबू सालेमला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सीबीआयने केली होती. मात्र अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षेच शिक्षा देता येत होती. त्यामुळे त्याला तेवढीच म्हणजे 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

अबू सालेमच्या जन्मठेपेची गुंतागुंत

अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर तो दुबईत पळून गेला. तिथे त्याने व्यवसाय सुरु केला. त्यानंतर तो पोर्तुगालला पळाला. त्याला सॅटेलाईट फोनच्या जीपीएसमुळे 20 सप्टेंबर 2002 मध्ये अटक झाली. तिथे तीन वर्ष त्याच्यावर खटला चालल्यानंतर पोर्तुगाल कोर्टाने त्याच्या भारतातील हस्तांतरणाला परवानगी दिली.

दरम्यानच्या काळात मी सालेम नाहीच असा दावा तो करत होता. मात्र सालेमला भारतात जेव्हा 1991 मध्ये पहिली अटक झाली होती, तेव्हा घेतलेले हाताचे ठसे आणि फोटोग्राफ हाच पुरावा भारताकडे होता. त्यावरुनच तोच अबू सालेम असल्याचं भारताने पोर्तुगाल सरकारला पटवून दिलं. त्यानंतर नोव्हेंबर 2005 मध्ये त्याला भारतात आणण्यात आलं.

हस्तांतरण करार 

अबू सालेमला भारताच्या स्वाधीन करताना, पोर्तुगाल आणि भारत यांच्यात करार झाला होता. त्यावेळी पोर्तुगालने जर अबू सालेम दोषी आढळला, तर त्याला त्यांच्या कायद्यांप्रमाणे शिक्षा द्यावी अशा अटी घातल्या.

त्यानुसार –

  • अबू सालेमला फाशी देता येणार नाही

  • अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षांची शिक्षा देता येईल


पोर्तुगालसोबतच्या या करारामुळे अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षांचीच शिक्षा देण्यात आली आहे. त्यापैकी 12 वर्षांची शिक्षा त्याने भोगली आहे. त्यामुळे उर्वरित 13 वर्षांचीच शिक्षा त्याला भोगावी लागू शकते. पण भारत सरकारने जर नियमांवर बोट ठेवलं तर त्याला जन्मठेपही होऊ शकते.

अबू सालेमला कोणत्या खटल्यात किती शिक्षा?

  • बिल्डर प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी – जन्मठेप

  • मुंबई बॉम्बस्फोट – जन्मठेप

  • बनावट पासपोर्ट – 7 वर्ष

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV