कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू

मयुरेश घरातला एकुलता एक कमवणारा मुलगा होता. मयुरेशची आई आजारी असते. त्यांना चालता देखील येत नाही. तर वडीलही घरीच असतात. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी एकट्या मुयरेशच्या खांद्यावर होती.

कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू

मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मयुरेश हळदणकर या 22 वर्षीय तरुणानं आपला जीव गमवला आहे.

मयुरेश घरातला एकुलता एक कमवणारा मुलगा होता. मयुरेशची आई आजारी असते. त्यांना चालता देखील येत नाही. तर वडीलही घरीच असतात. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी एकट्या मुयरेशच्या खांद्यावर होती.

mayuresh

परिसरातील प्रत्येकाशी मिळून-मिसळून राहणारा, प्रत्येक सणा-कार्यात आवर्जून सहभागी होणार मयुरेश सर्वांच्याच परिचयाचा होता. पण तो असा अचानक मनाला चटका लावून जाईल याची कुणाला साधी कल्पनाही नव्हती. तो सुंदर गणपतीच्या मूर्ती देखील घडवायचा. त्याच्या या कलेमुळे तो कायम चर्चेत असायचा.

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज मयुरेश हळदणकरचा नाहक जीव गेला. त्यामुळे वरळीतल्या त्याच्या घरात शोककळा पसरली.

mayuresh friend

नेमकी घटना काय?

मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत.

आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि चिरडून 22 जणांचा मृत्यू झाला.

मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे, तर जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. गरज पडल्यास जखमींना उपचारांसाठी इतरत्र हलवण्यात येईल, असंही मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

VIDEO :संबंधित बातम्या :
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री

बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या!

एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV