मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगरच्या एका 25 वर्षीय तरुणानं मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे असं या तरुणाचं नाव आहे.

मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : धुळे जिल्ह्यातल्या धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या एका 25 वर्षीय तरुणानं मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे असं या तरुणाचं नाव आहे.

अहमदनगरच्या राहणाऱ्या अविनाशनं कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र, त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता.

अखेर वैतागलेल्या अविनाशनं आज (बुधवार) मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी अविनाशला वेळीच ताब्यात घेतल्याने त्याला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. मात्र, यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयातील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 25 year old man’s suicide attempt infront of Mantralay latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV