दीराकडून वहिनीची हत्या, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असली तरी नेमकं हत्येचं कारण अस्पष्ट आहे. निखतचा मोठा दीर सलमान शेखने घरात घुसून निखतवर वार केले.

दीराकडून वहिनीची हत्या, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका 26 वर्षीय विवाहित महिलेची कौंटुंबिक वादातून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या मोठ्या दीरानेच धारधार हत्याराने ही हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

मृत महिला 2 महिन्यांची गरोदरदेखील असल्याची माहिती समजते आहे.निखत नदिम असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान आरोपी हत्येनंतर फरार असून सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असली तरी नेमकं हत्येचं कारण अस्पष्ट आहे. निखतचा दीर सलमान शेखने घरात घुसून निखतवर वार केले. यावेळी शेजारील महिलेने निखतला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात ती महिलादेखील जखमी झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन निखतचा मृतदेह ताब्यात घेतला. 2014 साली निखतचा विवाह झाला होता. तिला एक मुलगीदेखील आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV