नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत

गरीब कुटुंबातील लहान मुलांना अवघ्या काही हजारात विकत घेऊन त्यांना लाखो रुपयांना विकणाऱ्या एका महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत

मुंबई : गरीब कुटुंबातील लहान मुलांना अवघ्या काही हजारात विकत घेऊन त्यांना लाखो रुपयांना विकणाऱ्या एका महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिला मॅनेजमेंट पदवीधर असून ती मोठ्या रॅकेटसाठी काम करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

29 वर्षीय ज्युलीया फर्नांडीस वरळीतल्या सुशिक्षत घरात राहते. वडाळ्यात ही महिला गरीब घरातून 20 हजाराला बाळ विकत घेऊन गरजू कुटुंबाला लाखोंच्या किंमतीत विकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून महिलेला अटक केलं आणि तिच्याकडील 4 दिवसाच्या बाळालाही वाचवलं.

आरोपी महिला नर्सिंग होममध्ये कामाला होती. यादरम्यान तिच्या संपर्कात गर्भपात करण्यासाठी येणाऱ्या महिला होत्या. या महिलांकडून बाळ खरेदी करून विकण्याचा धंदा सुरू केला. दरम्यान, या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV