मुंबईतील नायर रुग्णालयात तरुणाचा मृत्यू, डॉक्टरसह तिघे अटकेत

नायर रुग्णालयातील एमआरआय मृत्यूप्रकरणी डॉक्टर सिद्धांत शाह यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये खेचलं गेल्यामुळे राजेश मारु या तरुणाचा मृत्यू झाला होता. यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.

मुंबईतील नायर रुग्णालयात तरुणाचा मृत्यू, डॉक्टरसह तिघे अटकेत

मुंबई : नायर रुग्णालयातील एमआरआय मृत्यूप्रकरणी डॉक्टर सिद्धांत शाह यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये खेचलं गेल्यामुळे राजेश मारु या तरुणाचा मृत्यू झाला होता. यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.

राजेश मारु असं या 32 वर्षीय युवकाचं नाव असून तो आपल्या बहिणीच्या सासूला बघायला नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. एमआरआय कक्षात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टर सिद्धांत शाह, वार्डबॉय विठ्ठल आणि महिला वॉर्ड अटेन्डंट सुनीता सुर्वे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान आमदार मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या डीनच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं. तर मृत राजेश मारुच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने 5 लाखांची मदत दिली जाईल अशी माहिती आमदार लोढा यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

राजेश मारु हा तरुण आपल्या बहिणीच्या सासूला बघायला नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. डॉक्टरकडून पेशंटचा एमआरआय करण्यास सांगितलं गेलं. त्यामुळे राजेश पेशंट आणि मेहुण्यासोबत एमआरआय रुमकडे निघाले.

एमआरआय मशिनने आत खेचलं, मुंबईतील रुग्णालयात तरुणाचा मृत्यू


राजेश पुढे होता आणि राजेशच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर होता. एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. 'मशिन अजून बंद आहे, तुम्ही आत जाऊ शकता', असं वॉर्डबॉयने सांगितलं. पण जेव्हा राजेश आत गेला तेव्हा एमआरआय मशिन सुरु होतं. मशिनने ऑक्सिजन सिलेंडर सोबत राजेशलाही आत खेचून घेतलं. त्याला लगेच बाहेर काढण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान राजेशचा मृत्यू झाला.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 3 arrested for nair hospital mri death in mumbai latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV