- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
रामनाथ सिंग आणि परत सिंग अशी जखमींची नावे असून मृतांची ओळख मध्य रात्री उशीरापर्यंत पटलेली नव्हती. या रस्त्यावर महापालिकेतर्फे भूमिगत गटरांचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी खोदलेल्या 10 मीटर खोल खड्ड्यात क्रेनच्या सहाय्याने कामगार उतरत असत.
सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान हे कामगार त्या क्रेनच्या बकेटमधून खड्ड्यात उतरत असताना क्रेनची वायर तुटली आणि पाचही कामगार लोखंडी बकेटसह या खोल खड्ड्यात कोसळले.
घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना देताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्वतः परिमंडळ दहाचे उपायुक्त पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी या कामगारांना खड्ड्यातून बाहेर काढून घाटकोपरच्या राजवाडी रुग्णालयात उपचासाठी पाठवण्यात आलं. मात्र राजावाडी रुग्णालयामधील डॉक्टरांनी यातील 3 कामगारांना मृत घोषित केलं. तर दोन जखमी रुग्णांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.