CCTV : वाशी स्थानकावरुन 3 वर्षीय मुलाचं अपहरण

अपहरणकर्ता या मुलाला घेऊन 1 वाजून 3 मिनिटांनी पनवेल लोकलमध्ये चढला. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

CCTV : वाशी स्थानकावरुन 3 वर्षीय मुलाचं अपहरण

वाशी : नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्थानकावरून एका 3 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. हा अपहरणाचा प्रकार स्टेशनवरच्या सीसीटीव्हीत कैद झाला. अपहरणकर्ता मुलाला घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

स्टेशन परिसरात राहणारी महिला तिच्या 3 वर्षाच्या मुलासोबत वडापाव खरेदी करण्यासाठी आली होती. पैसे देताना आईने मुलाचा हात सोडला आणि तो हरवला. आईच्या तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं, तेव्हा एक अज्ञात व्यक्ती या मुलाला घेऊन जाताना दिसला.

https://twitter.com/ANI/status/906391224944226305

हा व्यक्ती या मुलाला घेऊन 1 वाजून 3 मिनिटांनी पनवेल लोकलमध्ये चढला. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरुन सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असून अपहरणावेळी आरोपी व्यक्तीने दारु पिल्याचंही दृश्यांमधून दिसत आहे.

पाहा व्हिडिओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: kidnapping vashi अपहरण वाशी
First Published:

Related Stories

LiveTV