एकट्या मुंबईत चार चाकी वाहनांची संख्या तब्बल 10 लाख!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 20 March 2017 3:56 PM
एकट्या मुंबईत चार चाकी वाहनांची संख्या तब्बल 10 लाख!

मुंबई : मायानगरी मुंबई ही वेगासाठी ओळखली जाते. पण याच महानगराचा वेग आता कमालीचा मंदावला आहे. त्याला कारण ठरलं आहे मुंबईत वाढलेल्या चार चाकी वाहनांची संख्या. मुंबईत चार चाकी वाहनांची संख्या तब्बल 10 लाखांवर गेल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे.

मुंबईत जानेवारी 2016 पर्यंत 9 लाख 39 हजार चार चाकी वाहनं होती. पण गेल्या एका वर्षात या वाहनांची संख्या 9.3 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच मुंबईत आता 10 लाख 27 हजारा चार चाकी वाहनं धावत आहेत. याआधी शहरात 9 लाख 39 हजार चारचाकी वाहनं होती.

इतकंच नाही, तर राज्यभरातल्या सर्वप्रकारच्या एकूण 2 कोटी 90 लाख वाहनांपैकी 10 टक्के म्हणजे 29 लाख वाहनं ही एकट्या मुंबईत असल्याचंही समोर आलं आहे.

एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली, तरी ती वाहून नेण्यासाठी रस्त्यांची लांबी मात्र वाढत नाही. मुंबईत आजही फक्त दोन हजार किलोमीटर लांबीचेच रस्ते आहेत. ज्यामुळे वाहनांच्या बाबतीत मुंबई हे राज्यातलंच नाही, तर देशातलं सर्वाधिक घनतेचं शहर बनलं आहे.

मुंबईत प्रति शंभर मीटर 141 वाहनं उभी राहू शकतात. तर नागपूरमध्ये हाच आकडा फक्त 36 पर्यंत मर्यादित आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात 33 वाहनं आणि पुण्यात 26 वाहनं उभी राहतात.

संपूर्ण राज्यात सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या ही 2 कोटी 90 लाख इतकी आहे आणि त्यातली 10 टक्के म्हणजेच 29 लाख वाहनं ही एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे वाहनं चालवणं राहिलं दूर, आता पार्किंगसाठीही जागा उरलेली नाही.

मुंबईत लोकलवरचा रोज वाढत जाणारा भार मोठा आहे. शिवाय खोळंबलेले मेट्रो प्रकल्प, फसलेली मोनो यामुळे मुंबईचा वेग कमालीचा मंदावला आहे. त्यात पुराणकाळात बांधलेले फ्लायओव्हर लवकरच कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास मुंबईत या वाहनांना चालवण्यासाठी जागाच उरणार नाही.

First Published: Monday, 20 March 2017 3:56 PM

Related Stories

मुंबईत 700 रस्ते खोळंबले, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ट्वीट
मुंबईत 700 रस्ते खोळंबले, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ट्वीट

मुंबई : फक्त निवडणुकीच्या तोंडावर आणि पावसाळ्यातच राजकीय पक्षांना

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/04/2017

तुरीवरुन फडणवीस सरकारकडून कागदी घोडे नाचवणे सुरुच, सर्वाधिक तूर

काळ्या-पिवळ्या टॅक्सीचं घरबसल्या बुकिंग, लवकरच अॅप
काळ्या-पिवळ्या टॅक्सीचं घरबसल्या बुकिंग, लवकरच अॅप

मुंबई : मुंबईत ओला-उबरची गारेगार सेवा येण्यापूर्वी काळी-पिवळी

इंजिनिअरिंग सीईटी तूर्तास 'होल्ड'वर!
इंजिनिअरिंग सीईटी तूर्तास 'होल्ड'वर!

नवी दिल्ली: देशभरातील इंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात

मधुर भांडारकरांची सुपारी देणाऱ्या अभिनेत्रीला जेल
मधुर भांडारकरांची सुपारी देणाऱ्या अभिनेत्रीला जेल

मुंबई: दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या

तुम्हीही रस्त्यावरील थंडपेय पिताय? सावधान
तुम्हीही रस्त्यावरील थंडपेय पिताय? सावधान

मुंबई: सध्या सूर्यनारायण चांगलाच तापू लागला आहे. त्यामुळं साहजिकच

'बाहुबली 2' पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
'बाहुबली 2' पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

मुंबई: मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बाहुबली द कन्क्लुजन’ अर्थात

राज्यातील 137 आयपीएस आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील 137 आयपीएस आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्र सरकारने पोलिस खात्यातील 137 आयपीएस आणि नॉन आयपीएस

उल्हासनगरात वाईन शॉपवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
उल्हासनगरात वाईन शॉपवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार

उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प-5 भागातील मुकेश वाईन शॉपवर आज

‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र
‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी...

पनवेल : 24 मे रोजी होणाऱ्या पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी