मुंबई विमानतळावर तब्बल 50 किलो सोनं जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सोन तस्करीची मोठी घटना समोर आली आहे. तब्बल 50 किलो सोनं यावेळी जप्त करण्यात आलं आहे.

मुंबई विमानतळावर तब्बल 50 किलो सोनं जप्त

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सोन तस्करीची मोठी घटना समोर आली आहे. तब्बल 50 किलो सोनं यावेळी जप्त करण्यात आलं आहे.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तब्बल 15 कोटींच्या घरात आहे. डीएचएल या प्रसिद्ध कुरिअर कंपनीतर्फे हे 50 किलो सोनं मुंबई विमानतळावर आलं होतं. डीआरआय आणि कस्टम विभागाच्या संयुक्त कारवाईत हे सोनं पकडण्यात आलं आहे.

हे सोनं आखाती देशांमधून आल्याचा संशय डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय कुरिअरवरील पत्ताही खोटा असल्याचं समजतं आहे. यासंबंधी अधिक तपास सुरु असून यामागचा नेमका सूत्रधार शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 50 kg of gold seized in Mumbai airport latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV