मनसेची 6 नगरसेवकांचं सदस्यपद रद्द करण्यासाठी याचिका

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी मनसेनं केलेली याचिका कोकण भवन आयुक्तांनी दाखल करून घेतली आहे.

मनसेची 6 नगरसेवकांचं सदस्यपद रद्द करण्यासाठी याचिका

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी मनसेनं केलेली याचिका कोकण भवन आयुक्तांनी दाखल करून घेतली आहे. या याचिकेची सुनावणी होईपर्यंत 6 नगरसवेकांच्या नवीन गटाला मान्यता दिली जाणार नसल्याचं कोकण भवन आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

मनसेसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यान, हातावर शिवबंधन बांधून घेतलेले 6 नगरसेवकांची शिवसेनेचे नगरसेवक म्हणून नोंदणी होणार की त्यांचं सदस्यत्व रद्द होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दुसरीकडे शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ६ नगरसेवक अधिकृतरित्या मनसेचेच राहतील असा दावा मनसेनं केला आहे.

दरम्यान, कोकण भवन आयुक्तांनी ही याचिका दाखल करुन घेतल्यानं शिवसेनेला मात्र, मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार तसेच यावेळी भाजपनं नेमकी कोणती खेळी खेळणार या सर्वच गोष्टींकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत

काही दिवसांपूर्वी 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ वाढलं होतं. मात्र त्यापैकी परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव यांनी मनसेशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे.

मनसेचे नगरसेवक फोडून भाजपला शह

भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं होतं.

या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र याबाबत मनसेने कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती.

संबंधित बातम्या :

शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

मनसेकडून नगरसेवकांना व्हीप जारी, सभागृहात कोण- कुठे बसणार?

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?


7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक


पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!


शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत


मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?


मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!


करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप


दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले


‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 6 corporator’s membership cancellation MNS petition filed latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV