55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास

आरोपी इस्तेखार अन्सारीचा मुंबईतील शिवडी भागात व्यवसाय आहे. तक्रारदार महिला सँडहर्स्ट रोडमधील शाळेत जाताना आरोपी तिचा पाठलाग करायचा.

55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास

मुंबई : 55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास ठोठावल्याची घटना मुंबईत घडली आहे. दोन वर्षांपासून महिलेवर नजर ठेवणाऱ्या इसमाला तीन महिन्यांची कोठडी आणि 5 हजार रुपयांचा दंड मॅजिस्ट्रेट कोर्टाने सुनावला आहे.

दंडाची रक्कम तक्रारदार महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर स्टॉकिंग (नजर ठेवणे किंवा पाठलाग) हा भादंवि अन्वये दंडनीय अपराध मानला जातो

आरोपी इस्तेखार अन्सारीचा मुंबईतील शिवडी भागात व्यवसाय आहे. तक्रारदार महिला सँडहर्स्ट रोडमधील शाळेत जाताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. तिच्याशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने आरोपीने तिच्याकडे एकटक पाहणं हे स्टॉकिंग आहे आणि महिलेचा जबाब त्यासाठी पुरेसा असल्याचं कोर्टाने सांगितलं.

'सकाळी साडेसातच्या सुमारास स्टेशनवर उतरल्यावर आरोपी आपल्याकडे रोखून पाहत आणि पाठलाग करत असे. आपण थांबवल्यावर तो थांबायचा. अनेकदा आपण त्याला पाठलाग न करण्याचं बजावूनही त्याने हा प्रकार थांबवला नाही. अखेर आपली सुरक्षिता धोक्यात आल्याच्या भीतीने आपण पोलिसात तक्रार केली' असं तक्रारदार महिलेने सांगितलं.

आपल्या व्यवसायासाठी त्या भागातील दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी जात असल्याचा दावा आरोपीने केला, मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV