मोबाईल, पर्स चोरुन नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीला लोकलमधून फेकलं

नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 11.30 वा. 19 वर्षीय ऋतूजा बोडके या तरुणीला लुटून लोकलमधून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मोबाईल, पर्स चोरुन नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीला लोकलमधून फेकलं

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 11.30 वा. 19 वर्षीय ऋतुजा बोडके या तरुणीला लुटून लोकलमधून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

काल रात्री नेरुळ-जुईनगर दरम्यान ऋतुजा महिला डब्यातून प्रवास करत एक व्यक्ती थेट त्या डब्यात घुसला. यावेळी त्या व्यक्तीनं ऋतुजाकडील वस्तू हिसकावून घेण्याचा प्रयत्नही केला. यावेळी विरोध करणाऱ्या ऋतूजाला आरोपीने ट्रेनमधून खाली ढकलून तिचा मोबाईल, पर्स आणि कानातील रिंगावर डल्ला मारला. यावेळी ट्रेन जुईनगर रेल्वे स्थानकात प्रवेश करत होती. यावेळी ट्रेनचा वेग कमी झाल्यानं खाली पडलेल्या ऋतूजाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र तिच्या डोक्याला मार लागला असून सध्या तिला वाशीच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, आरोपी सी-वूड स्थानकापासून सदर तरुणीचा पाठलाग करत होता, अशी माहिती समोर येत आहे. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असून नेरुळ, जुईनगर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध घेणं सुरु आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: A 19 year old girl was thrown out of the train in Navi Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV