शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर रात्री साडेआठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज (गुरुवार) तब्बल दीड चर्चा झाली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संदर्भात ही बैठक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र या बैठकीत अनेक राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि फडणवीस यांच्यातील बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, असं असलं तरी या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेल नाही.

राणेंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळू नये यासाठी शिवसेना आणि काँग्रेस जोरदार प्रयत्न करत असताना दुसरीकडे पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दुसरीकडे भाजपनं आपल्या उमेदवारांसाठी चाचपणीही सुरु केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्त्या शायना एनसी आणि प्रसाद लाड या तिघांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मात्र, यांच्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपने उमेदवार दिला, तरी शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय उमेदवार जिंकून येणं कठीण आहे. काल (बुधवार) याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चाही झाली. मात्र शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

संबंधित बातम्या :

विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट?

उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीत नेमकं काय झालं?

राणेंबाबत संभ्रम कायम, भाजपकडून इतर उमेदवारांची चाचपणी

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’वर

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: A meeting between Sharad Pawar and Chief Minister Fadnavis will be held latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV