निर्धार..... शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा!

पायाला गंभीर जखम होऊनही मोर्चात शेवटपर्यंत रहाण्याचा निर्धार करणाऱ्या आज्जींचा. या मोर्चामध्ये विनाचप्पल चालल्याने सखुबाई या वृद्ध आजींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे त्या आजींना हॉस्पिटलमध्ये उपचार आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

निर्धार..... शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा!

मुंबई : सूर्य आग ओकत होता... चालून चालून पाय सुजले होत... पायाला आलेले फोड फुटून पायातून रक्त वाहत होतं.. पण अन्नदात्याने निर्धार केला होता तो आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करुन घेण्याचा. शेतकऱ्यांच्या मोर्चातले काही मन हेलावून टाकणारे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

असाच एक फोटो आहे, पायाला गंभीर जखम होऊनही मोर्चात शेवटपर्यंत रहाण्याचा निर्धार करणाऱ्या आज्जींचा. या मोर्चामध्ये विनाचप्पल चालल्याने सखुबाई या वृद्ध आजींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे त्या आजींना हॉस्पिटलमध्ये उपचार आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मात्र जीवाची पर्वा न करता त्या मोर्चासोबतच राहिल्या. माझी हक्काची जमीन मला मिळावी आणि माझ्या सारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथेच थांबणार असा निर्धार या आजींनी केला.

या आजींच्या वेदना न पाहावल्याने एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी आज्जींना नवी चप्पल आणून दिली. या नव्या चपला मनश्रीने स्वतःच्या हाताने आजींच्या पायात घातल्या.

संबंधित बातम्या :

किसान सभेच्या मागण्या आणि सरकारचं उत्तर!


शेतकऱ्यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश, लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागे

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: a old women who struggle till end of kisan long march
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV