टी-20मध्ये एबी डिव्हिलियर्सची तुफानी फलंदाजी, 19 चेंडूत 50 धावा

टायटन्सकडून खेळताना डिव्हिलियर्सनं या धडाकेबाज खेळीत पाच षटकार आणि तीन चौकारही ठोकले.

टी-20मध्ये एबी डिव्हिलियर्सची तुफानी फलंदाजी, 19 चेंडूत 50 धावा

 

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा तुफानी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं आफ्रिकेतील रॅम स्लॅम टी-20 स्पर्धेत अवघ्या 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या आहेत. टायटन्सकडून खेळताना डिव्हिलियर्सनं या धडाकेबाज खेळीत पाच षटकार आणि तीन चौकारही ठोकले.

लॉयन्स आणि टायटन्समधील सामन्यात लॉयन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लॉयन्सनं 6 गडी 127 धावा केलेल्या असताना पावसानं हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार टायटन्सला विजयासाठी 135 धावांचं आव्हान देण्यात आलं.

या आव्हानाचा पाठलाग करताना टायटन्सला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. हेन्री डेनिस 5 धावांवर बाद झाला. तर डिकॉकही 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या डिव्हिलियर्सनं तुफानी फलंदाजी करत अवघ्या 12 षटकातच संघाला सामना जिंकून दिला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ab De Villiers scored half centuries in just 19 balls
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV