एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/01/2018

1.    जमिनीच्या मोबदल्यासाठी तीन महिने उंबरे झिजवूनही निराशा, हतबल शेतकऱ्याचा मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न, 80 वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती चिंताजनक https://goo.gl/AwX8D9

2.    2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार, शिवसेनेचा कार्यकारिणीत एल्गार https://goo.gl/MJ52na  तर स्वबळावर लढल्यास सेनेचे केवळ 5, तर भाजपचे 28 खासदार निवडून येतील, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंचं भाकित https://goo.gl/Z1D5vj

3.    अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवा, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान, तर 56 इंचाच्या छातीत किती शौर्य आहे, हे महत्त्वाचे असल्याचाही टोला https://goo.gl/w7fLvm

4.    हंगामाच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी साखरेचे दर 600 रुपयांनी पाडले, वाढीव एफआरपी देण्यास कारखानदारांचा नकार, विरोधकांची जोरदार टीका https://goo.gl/pYXrQ8

5.    शेतात वीज कनेक्शन नसतानाही 26 हजारांचं बिल, यवतमाळमधील आर्णीतील अंबादास खापरकरांना महावितरणच्या अजब कारभाराचा अनुभव https://goo.gl/dgLNYB

6.    मलबार हिलमध्ये 1800 चौ.फूट घर, मात्र घराच्या ताब्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची, 87 वर्षीय वृद्धाने भाडेकरुविरुद्धची केस 44 वर्षांनी जिंकली! https://goo.gl/aBP1Qp

7.    भारताचा जीडीपी 1997 च्या तुलनेत सहा पटींनी वाढला, दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदींची माहिती, तर तंत्रज्ञानामुळे भारताचं अर्थकारण सुधारल्याचाही दावा https://goo.gl/fZzes3

8.    शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्सची 36 हजारांवर विक्रमी उसळी, निफ्टीही 11 हजार अंशांवर https://goo.gl/rkqVWk

9.    अमित शाह यांच्या दोषमुक्तीला आव्हान न देण्याचा निर्णय योग्यच, सीबीआयकडून हायकोर्टात दावा, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्या याचिकेच्या वैधतेला सीबीआयचं आव्हान https://goo.gl/b1HbyT

10.    तरुण-तरुणी म्हणाले, लग्न झालंय, तर चौकशीचा प्रश्नच नाही, केरळमधील हादिया-शफिनच्या कथित ‘लव्ह जिहाद’वर सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा https://goo.gl/fwDJa8

11.    एकही लेक्चर झालं नसताना MSc मायक्रोबायोलॉजीच्या परीक्षांचा घाट, एबीपी माझाच्या बातमीनंतर मुंबई विद्यापीठाने तारीख बदलली, आता 9 फेब्रुवारीपासून परीक्षा https://goo.gl/WJB8uy

12.    एकाचं लग्न दोन दिवसांवर, तर दुसऱ्याचं आठवड्यावर, भिवंडीत अपघातात बुलेटस्वार तिघा मित्रांचा जागीच मृत्यू https://goo.gl/YRSP7C

13.    देशातील 79 टक्के महिलांना, 78 टक्के पुरुषांना हवं 'कन्यारत्न', राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात आशादायी चित्र https://goo.gl/au1UkZ

14.    खोल दरीवर अधांतरी चालण्याचं थ्रिल अनुभवा, माळशेज घाटात 700 मीटर खोल दरीवर 18 मीटर लांबीचा पारदर्शक वॉक-वे प्रस्तावित, जिल्हा प्रशासनला बजेटच्या मंजुरीची प्रतीक्षा https://goo.gl/HGekKE

15.    सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा ‘पद्मावत’चा मार्ग मोकळा, मध्य प्रदेश, राजस्थानच्या याचिका फेटाळल्या, तर दीपिका पादुकोण सिद्धीविनायकाच्या चरणी https://goo.gl/SWFBzX

माझा विशेष : भाजपला वगळून शिवसेनेला स्वबळाचं राजकारण जमेल?, पाहा विशेष चर्चा आज 9 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha whatsapp Bulletin 23rd January 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV