एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/11/2017

 1. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेने उधळली, कार्यकर्तेही भिडले, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला https://gl/FbMEB3


 

 1. नागपुरात ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून पोलिसांचाच धिंगाणा, बर्थ डे सेलिब्रेशनसाठी मध्यरात्री चौकीतच ढोल-ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी https://goo.gl/rqT1QA


 

 1. सांगलीतील अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी पोलीस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळेंना सहआरोपी करा, कोथळे कुटुंबियांची हायकोर्टात याचिका, SIT चौकशीचीही मागणी https://goo.gl/8qHLey


 

 1. कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, नाभिक समाजावरील आक्षेपार्ह विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांचा पुन्हा माफीनामा, तर माफीनाम्यानंतर नाभिक समाजाचं नियोजित आंदोलन मागे https://goo.gl/1wcYcf


 

 1. जनता आता दूधखुळी राहिलेली नाही, शिवसेनेला मतदार जागा दाखवतील, अजित पवारांची टीका https://goo.gl/CxPHFE , तर एकत्र नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं, शरद पवारांचा सेनेला सल्ला https://goo.gl/32pCZF


 


 1. ऐच्छिक असूनही मुंबईतील रेस्टॉरंट चालकाकडून सर्व्हिस चार्जची आकारणी, ग्राहक कोर्टाकडून मालकाला तब्बल 10 हजारांचा दंड https://goo.gl/XjQeUt


 

 1. दहावीत मिळणाऱ्या चित्रकलेच्या गुणांमध्ये कपात, आता 25 गुणांऐवजी फक्त 15 गुण मिळणार, शिक्षण खात्याचा नवा नियम https://gl/6i9qqE


 

 1. गाडी टोईंग करण्याआधी आता वाहतूक पोलिस भोंग्यावरुन सूचना देणार, मालक आला तर गाडी जागेवरच दंडाविना परत मिळणार https://goo.gl/A278kL


 

 • ‘मुंबई टू गोवा’ क्रुझ प्रवासाला ख्रिसमसचा मुहूर्त, कोकणात 71 ठिकाणी जेट्टी उभारणार, 25 डिसेंबरला पहिली क्रुझ रवाना होणार https://goo.gl/Sjn234


 

 • ठाण्यातील दिवा परिसरातून स्फोटकांचा मोठा साठा जप्त, 31 इलेक्ट्रिक डिटोनेटर, 61 जिलेटीनच्या ट्यूब हस्तगत, तिघांना अटक https://goo.gl/TFCrEn


 

 • नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं रुग्णालयाच्या छतावर चढत ‘शोले स्टाईल’ आंदोलन, पोलीस मुख्यालयात बदली झाल्याने संजय जोंधळे नाराज https://goo.gl/zTx8gY


 

 • आर्चरी स्पर्धेदरम्यान धनुष्यातून सुटलेला बाण थेट मैदानाबाहेर, राष्ट्रीय खेळाडू जुई ढगेच्या हातात बाण घुसला, रत्नागिरीतील डेरवणमधील घटना https://gl/5n4wwa


 

 • 500 आणि 2 हजारच्या नोटांवर लिहिलेलं असलं, तरी त्या स्वीकारा, आरबीआयचे बँकांना आदेश, तर रंग लागलेल्या नोटाही स्वीकारणं बंधनकारक https://goo.gl/p32jtf


 

 • टीम इंडियाची नागपूर कसोटीवर मजबूत पकड, दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 312 धावा, मुरली विजय पाठोपाठ चेतेश्वर पुजाराचंही खणखणीत शतक https://goo.gl/pG2mdP


 

माझा कट्टा : दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin 25th November 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV