एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/02/2018

1.    मी कासव होईन, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही, उद्धव ठाकरेंकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार https://goo.gl/DhrQVh तर आधी डल्ला मारला, आता हल्लाबोल करत आहेत, औरंगाबादेतही राष्ट्रवादीवर निशाणा https://goo.gl/JdnqSa

2.    चंद्राबाबू नायडूंचा उद्धव ठाकरेंना फोन, एनडीए सोडण्यावर दोघांमध्ये चर्चा, ‘टाईम्स’च्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ  https://goo.gl/hmbfec तर भाजपसोबतच्या मतभेदांवर तोडगा काढू, टीडीपी नेते चौधरींचं स्पष्टीकरण https://goo.gl/aR8jFZ

3.    मी तोंड उघडलं, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल, भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा इशारा, राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत जाण्याचा निर्णय https://goo.gl/8PVaxX

4.    विरोधक अजून पुढचे 10 वर्षे सत्तेपासून लांब, मुख्यमंत्र्यांना विश्वास, तर भाजपकडून चुका होतील, पण बेईमानी होणार नसल्याचाही दावा https://goo.gl/YKT6pm

5.    बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्यांना 7 महिन्यात कामावरुन कमी करा, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला आदेश, 11,700 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार https://goo.gl/hE1KDZ

6.    डी. एस. कुलकर्णींविरोधात गुंतवणूकदार सुप्रीम कोर्टात जाणार, डीएसकेंच्या मालमत्तांचा लिलाव करुन पैसे परत मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरबीआयकडे पाठपुरावा करण्याचाही निर्णय  https://goo.gl/pyNQVi

7.    मतांच्या सौदागरांमुळे तिहेरी तलाक विधेयक रखडलं, भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांचा शरद पवारांवर निशाणा https://goo.gl/hNhPSC

8.    गोपीनाथ मुंडेंना भाजपने त्रास दिला असेल, तर ते आमचं आम्ही पाहून घेऊ, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर https://goo.gl/NaSLFa

9.    मध्यमवर्गीयांना चार वर्षात बरंच काही दिलं, यंदाचा अर्थसंकल्प गरीब आणि शेतकऱ्यांचा, अर्थसंकल्पानंतर अरुण जेटलींची पहिलीच एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://goo.gl/22GPcy

10.    समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या 90 वर्षीय आजीबाईंना अखेर न्याय, एबीपी माझाच्या बातमीनंतर मोबदला बँक खात्यात जमा https://goo.gl/QkbMmk

11.    लग्न मोडल्याच्या नैराश्यातून नाशिकमध्ये इंजिनिअर तरुणाची आत्महत्या, खिडकीच्या गजाला नायलॉन मांजाने गळफास घेत आयुष्य संपवलं https://goo.gl/n4Pm8H

12.    जुन्नरमध्ये विजेची तार तुटल्याने ऊसाच्या फडाला आग, बिबट्याच्या तीन पिल्लांचा होरपळून मृत्यू https://goo.gl/c1K7mR

13.    केरळच्या विधानसभा अध्यक्षांच्या चष्म्याचा खर्च सरकारी तिजोरीतून, 50 हजारांचं बिल राज्य सरकारने भरलं, आरटीआयमधून माहिती समोर https://goo.gl/ESYuie

14.    पाच बॉलची ओव्हर, षटकार मारला की बाद, अहमदनगरमध्ये वुमेन्स प्रीमिअर लीगचा थरार https://goo.gl/mfnWs6

15.    सेन्चुरियनच्या वन डेत टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी धुव्वा, चहल आणि यादवच्या फिरकीनं दक्षिण आफ्रिकेची दाणादाण https://goo.gl/fmL5HG

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग : 'घायल' आणि 'घातक' : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक https://goo.gl/Wyo9Az

माझा कट्टा : सीआयडीच्या 20 वर्षांच्या प्रवासाचे खुमासदार किस्से, अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 8 वाजता एबीपी माझावर...

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs     

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin 4th February 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV