मला पोर्तुगालला परत न्या : अबू सालेमची कोर्टात धाव

मला पोर्तुगालला परत न्या : अबू सालेमची कोर्टात धाव

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमनं युरोपीयन कोर्टात धाव घेतली आहे. सालेमनं पोर्तुगालला परत नेण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील  1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा विशेष न्यायालयाकडून सालेमला दोषी ठरवण्यात आलं आहे. कोर्ट उद्या त्याला शिक्षा सुनाणार आहे.

अबू सालेमला 1993 च्या स्फोटात सालेमवर कट रचणे, हत्या आणि टाडाअंतर्गत दोषी ठरवण्यात  आलं आहे.

याआधीच सालेमनं युरोपीयन कोर्टात धाव घेऊन पोर्तुगालला परत नेण्याची विनंती केली आहे. 2014 साली सालेमचं पोर्तुगालमधून काही अटींसह प्रत्यार्पण झालं होतं. त्यावेळी झालेल्या करारानुसार अबू सालेमला फाशी किंवा 25 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकणार नाही.

त्यामुळे सालेमचं पुढे काय होईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान अबू सालेमनं युरोपीयन कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत, आपल्यावर भारतात बेकायदेशीर कारवाई होत असून, त्याला ठेवण्यात आलेली तुरुंगातल्या जागेचीही तक्रार केली आहे.

नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहातल्या अशा खोलीत ठेवण्यात आलंय, जिथे सूर्यप्रकाश अजिबात येत नाही, असं त्याने याचिकेत म्हटलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: abu salem अबू सालेम
First Published:
LiveTV