मुंबईत नाताळच्या मुहूर्तावर उद्यापासून एसी लोकल धावणार

नाताळच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गारेगार एसी लोकलचा प्रवास करता येणार आहे. बहुचर्चित एसी लोकल उद्या 25 डिसेंबरपासून प्रत्यक्षात धावणार आहे.

मुंबईत नाताळच्या मुहूर्तावर उद्यापासून एसी लोकल धावणार

मुंबई : मुंबईकरांची एसी लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण उद्यापासून एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणारआहे.

एसी लोकलची अंतिम चाचणी आज चर्चगेट ते अंधेरी आणि पुन्हा अंधेरी ते चर्चगेट अशा रेल्वेस्थानकांदरम्यान घेण्यात आली.

उद्यापासून दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पहिली ऐसी लोकल चर्चगेटसाठी रवाना होईल. त्यानंतर चर्चगेट ते विरार या जलद मार्गावर ही लोकल धावेल. दिवसाला 12 फेऱ्या ही लोकल करेल.

शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल.

या गाडीचे तिकीट 60 ते 220 रुपये असेल, अशी माहिती मिळते आहे. मात्र याचे निश्चित भाडे अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

एसी लोकलचे वैशिष्ट्य :

  • 110 किमी प्रति तास वेगाने धावेल

  • एकूण अंदाजे 6 हजार प्रवासी एका वेळी प्रवास करू शकतील.

  • पहिला आणि शेवटचा डबा महिलांसाठी राखीव.

  • दुसऱ्या आणि अकराव्या डब्यात 7 आसने वृद्धांसाठी राखीव.

  • चौथ्या आणि सातव्या डब्यात 10 आसने अपंग प्रवाशांसाठी राखीव.

  • महालक्ष्मी ते बोरीवली अशी एकच धीमी सेवा दिवसाला असेल बाकी जलद फेऱ्या असतील.

  • जलद गाडीला मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर आणि वसई रोड ही स्थानके असतील.


मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ac local will run from tomorrow in mumbai latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV