शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती.

शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

मुंबई: मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर, लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.

परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती.

शिवसेनेने कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक फोडले, तसंच त्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती.

याशिवाय संजय तुर्डे यांनीही आपल्याला शिवसेनेने ऑफर दिल्याचा दावा केला होता. त्यावरुन आता परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची चिन्हं आहेत.

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप


शिवसेना करोडो रुपये देऊन नगरसेवकांना विकत घेत असल्याचा आरोप, किरीट सोमय्यांनी केला होता . त्याबाबतचं पत्र त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस, कोकण महसूल विभाग यांना लिहिलं आहे.

धक्कादायक म्हणजे आमच्या मित्रपक्षाने 4 नगरसेवकांना किडनॅप केलं असून, त्यांना 2 ते 4 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा दावा सोमय्यांनी केला.

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

दरम्यान मनसे सोडून शिवसेनेत गेलेले सहा नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक परतणार असल्याचा दावा मनसेने केला होता. या चार नगरसेवकांनी  पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं  मनसेने म्हटलं होतं.

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना 

सहा नगरसेवकांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरु असून आम्ही सहाही नगरसेवक शिवसेनेतच आहोत.’ अशी माहिती नगरसेवक दिलीप लांडे यांनी दिली.

संबंधित बातम्या

सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे 

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना 

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ACB to register case against two of the six MNS corporators for horse trading
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV