कर्जमाफी घोळ : आयटी विभागाच्या प्रधान सचिवांची उचलबांगडी होणार?

कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाप्रकरणी आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. गौतम यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे दिला पदभार देण्यात आला आहे.

कर्जमाफी घोळ : आयटी विभागाच्या प्रधान सचिवांची उचलबांगडी होणार?

मुंबई : कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाप्रकरणी आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. गौतम यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे दिला पदभार देण्यात आला आहे.

कर्जमाफीची घोषणा होऊन कित्येक महिने उलटले, तरी कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ कायम असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढ देण्यात आली. पण तरीही वारंवार तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

धुळ्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रात 4-4 दिवस नंबर लागावा लागला होता. त्यापाठोपाठ बीड, परभणी आणि लातूरमध्येही थोड्याफार फरकाने हिच स्थिती होती.

दुसरीकडे सरकारकडून हिंगोलीतील शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची प्रमाणपत्रं परत घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता पंढरपुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे सरकारच्या खात्यात पुन्हा वळते झाल्याने शेतकरी बुचकळ्यात पडले आहे.

त्यामुळे या ऑनलाईन कर्जमाफी घोळामुळे आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याजागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे दिला पदभार देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जमाफीचे पैसे पुन्हा सरकारकडे वळते

VIDEO : हिंगोली : कर्जमाफी घोळ, समारंभ संपण्याआधीच कर्जमाफीचं प्रमाणपत्रं परत घेतलं!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Action against Vijay Kumar Gautam in the case of farmers loan wavering online process
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV