ठाण्यातील सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं नाव

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 1 ने नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याची पत्नी आणि त्यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांना समन्स बजावलं आहे.

ठाण्यातील सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं नाव

ठाणे : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणलेल्या सीडीआर घोटाळ्यात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नीचे सीडीआर मागवल्याचा आरोप आहे.

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 1 ने नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याची पत्नी आणि त्यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांना समन्स बजावलं आहे. पत्नीचे काँटॅक्ट्स आण ठावठिकाण्यावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाझने सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स मागवल्याची माहिती आहे.

वकील रिजवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनच्या पत्नीचे सीडीआर काढले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात हे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र तीन वेळा बोलावूनही अद्याप नवाजुद्दीन चौकशीसाठी आलेला नाही.

सीडीआर प्रकरणी आतापर्यंत खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली होती. सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

संबंधित बातम्या :


सीडीआर प्रकरण : खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी


CDR लीक प्रकरण : व्हीआयपी नंबर समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय


CDR लीक प्रकरण : व्होडाफोनसह 7 मोबाईल कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात


कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक


महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actor Nawazuddin Siddiqui summoned by cops in Thane CDR case latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV