अभिनेता ऋषी कपूर यांना मुंबई महापालिकेची नोटीस

By: | Last Updated: > Thursday, 20 April 2017 3:03 PM
Actori Rishi Kapoor gets BMC notice for cutting extra brach of tree

मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेता ऋषी कपूर यांना नोटीस पाठवली आहे. वांद्र्यातील पाली हिल्समध्ये असलेल्या कृष्णा राज बंगल्यातील वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त कापल्याने ही नोटीस पाठवली आहे.

महापालिकेच्या एका अधिकऱ्याने सांगितलं की, मागील आठवड्यात ऋषी कपूर यांना झाडाच्या सहा फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. इमारच्या बांधकामात अडचणी येत असल्याने त्यांना परवानगी दिली होती. परंतु निरीक्षण केलं असता असं दिसलं की, झाडाच्या जास्त फांद्या कापल्या आहेत.

झाडाच्या फांद्या छाटायला परवानगी दिली होती. पंरतु परवानगीचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन झाडाच्या बळकट फांद्या कापल्या. त्यामुळे ऋषी कपूर आणि कंत्राटदारांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी विचारणा करत ऋषी कपूर यांना उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण तसंच जतन (सुधारणा) अधिनियम 155 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी बीएमसीला पोलिसांत तक्रार दाखल करावी लागेल.

नोटीसला उत्तर देताना ऋषी कपूर यांनी सांगितलं की, “हे काम करत असलेल्या कंत्राटदाराशी चर्चा करेन. झाड कापलेलं नाही. कंत्राटदाराने चूक केली आहे का हेदेखील पाहिन.”

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Actori Rishi Kapoor gets BMC notice for cutting extra brach of tree
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र
'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र

मुंबई : मिसेस फनी बोन्स अशा टोपणनावाने नर्मविनोदी शैलीत लेखन करणारी

...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!
...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!

मुंबई : अभिनेता सलमान खान गणपती बाप्पाचा केवढा मोठा भक्त आहे हे

तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला
तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आपल्या बिनधास्त

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर
कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक

शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज

मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर
सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर