अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करा : कोर्ट

ठाणे क्राईम ब्रांचनं अखेर 23 जून 2017 रोजी ममताला फरार घोषित केलं. याची नोटीस पोलिसांनी ममताच्या यारी रोडवरील घरावर चिटकवली. ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र ममता कुलकर्णी कोर्टासमोर हजर न राहिल्यानं आज अखेर कोर्टानं संपत्ती जप्तीचे आदेश दिले आहेत.

अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करा : कोर्ट

ठाणे : दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणातील आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करा, असे आदेश ठाणे न्यायालयानं दिले आहेत. यापूर्वीच न्यायालयाने फरार घोषित केलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या केनियामध्ये वास्तव्यास असल्याची पोलिसांची माहिती आहे.

13 एप्रिल 2016 रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून तब्बल 12 लाख रुपयांचं इफेड्रिन जप्त केलं होतं. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून 2 हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देशविदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला होता. या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हादेखील आरोपी आहे.

याशिवाय ममताविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून केंद्रीय गुप्तचर खात्याकडे सातत्याने पाठपुरावाही सुरु आहे. ती केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे. रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर सर्व विमानतळांना संबंधित आरोपीबाबत सतर्क केले जातं.

दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं आहे. यापूर्वीच या प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट बजावलं होतं. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

ठाणे क्राईम ब्रांचनं अखेर 23 जून 2017 रोजी ममताला फरार घोषित केलं. याची नोटीस पोलिसांनी ममताच्या यारी रोडवरील घरावर चिटकवली.

ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र ममता कुलकर्णी कोर्टासमोर हजर न राहिल्यानं आज अखेर कोर्टानं संपत्ती जप्तीचे आदेश दिले आहेत. दरम्यान दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीसह विकी गोस्वामीही फरार आहे.

काय आहे प्रकरण?

एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे.

कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून  2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं.

या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

संबंधित बातम्या :


ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस


ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित


ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये, ठाणे पोलिसांकडून शिक्कामोर्तब !


ABP EXCLUSIVE : मी लग्नही केलं नाही आणि 12 वर्ष शारीरिक संबंधही ठेवले नाही- ममता कुलकर्णी

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: actress mamata kulkarnis property to be seized thane court ordered latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV