गळ्यात कोब्रा घालून व्हिडीओ, श्रुती उल्फतला अटक आणि सुटका

By: | Last Updated: > Thursday, 9 February 2017 4:41 PM
गळ्यात कोब्रा घालून व्हिडीओ, श्रुती उल्फतला अटक आणि सुटका

मुंबई : गळ्यात कोब्रा घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री श्रुती उल्फतची जामीनावर सुटका झाली आहे. मुंबईतील बोरीवली कोर्टाकडून 5000 रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झाला आहे.

कोब्रा गळ्यात घालून काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री श्रुती उल्फतला आजच अटक करण्यात आली होती. वन विभागाने भारतीय वनजीव संरक्षण कायदा 9, 48, 49 या कलमानुसार कारवाई केली.

श्रुती उल्फत, विपिन पुरी यांच्यासह नितिन सोलंकी आणि उत्कर्ष बाली या दोन प्रॉडक्शन मॅनेजरना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु जामीन मंजूर झाल्याने श्रुतीची सुटका झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘नागार्जुन.. एक योद्धा’ ही मालिका ‘लाईफ ओके’ वाहिनीवर गाजली होती. या मालिकेत भूमिका करणाऱ्या अभिनेत्री श्रुती उल्फतने गळ्यात नाग घालून दोन व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट केले होते. हा व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. श्रुतीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

श्रुती उल्फतने अभिनय केलेले राझ, ऐतबार यासारखे चित्रपट गाजले होते. त्याचप्रमाणे चलती का नाम अंताक्षरी हा टीव्ही शो आणि आय लव्ह यू, ससुराल गेंदा फूल, जमाई राजा, नागार्जुन.. एक योद्धा, गुस्ताख दिल यासारख्या मालिकांमध्येही ती झळकली होती.

हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी टीका सुरु झाली होती. त्यानंतर श्रुतीसह चार जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या चौघांना अटक झाली आहे. यामध्ये मालिकेतील आणखी एका अभिनेत्री आणि प्रोडक्शनमधील दोन व्यवस्थापकांचा समावेश आहे.

काही पशुप्रेमींच्या तक्रारीनंतर मुंबई प्रादेशिक विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला, नागाच्या चित्रणाचा व्हिडिओ स्पेशल इफेक्ट्सचा वापर करुन तयार केल्याचा दावा प्रॉडक्शन टीमने केला होता. त्यामध्ये कोणत्याही जिवंत अथवा मृत सापाचा समावेश नसल्याचं प्रॉडक्शन टीमने म्हटलं होतं.

त्यानंतर वन विभागाने सोशल मीडियावरील व्हिडिओ डाऊनलोड करुन मुंबईच्या कलिनामधील फॉरेंसिक लॅबला परीक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारी रोजी त्याचा रिपोर्ट मिळाल्यावर त्या व्हिडिओत जिवंत साप वापरल्याचं दिसून आले. त्यानंतर चौघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

 

 

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/05/2017

आता खासगी अनुदानित शाळांमध्येही शिक्षक भरतीसाठी परीक्षा,

राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा राजभवनावर धडकली
राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा राजभवनावर धडकली

मुंबई : राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा राजभवानावर धडकली आहे.

गिरीश बापटांच्या आवाहनाला औषध विक्रेत्यांकडून केराची टोपली
गिरीश बापटांच्या आवाहनाला औषध विक्रेत्यांकडून केराची टोपली

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या संप मागे

‘अंगणवाडी घोटाळ्यात पंकजा मुंडे, दानवेंचा सहभाग’, 'आप'चा आरोप
‘अंगणवाडी घोटाळ्यात पंकजा मुंडे, दानवेंचा सहभाग’, 'आप'चा आरोप

मुंबई: आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी भाजपच्या

राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा आज राजभवनावर धडकणार
राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा आज राजभवनावर धडकणार

मुंबई : राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रेला आज राजभवनावर धडकणार आहे.

राष्ट्रपती व्हायचं असेल, तर पवारांनी एनडीएत यावं: आठवले
राष्ट्रपती व्हायचं असेल, तर पवारांनी एनडीएत यावं: आठवले

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे

औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात विक्रेत्यांचा देशव्यापी संप
औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात विक्रेत्यांचा देशव्यापी संप

ठाणे : ऑनलाईन फार्मसीला विरोध करत देशभरातील औषध विक्रेत्यांनी

माजी केंद्रीय मंत्र्याचा विनायक मेटेंच्या शिवसंग्राममध्ये प्रवेश
माजी केंद्रीय मंत्र्याचा विनायक मेटेंच्या शिवसंग्राममध्ये प्रवेश

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी

आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टींचा मुलगा सौरभला चक्कर
आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टींचा मुलगा सौरभला चक्कर

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/05/2017

बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 पासून वेबसाईटवर पाहता येणार, निकाल