राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी झायरा वसीम माझा कट्ट्यावर

एबीपी माझाच्या कट्ट्यावर दंगल गर्ल झायरानं दंगलमध्ये तिच्या निवडीचे खास किस्से सांगितले.

राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी झायरा वसीम माझा कट्ट्यावर

मुंबई : देशाचं नंदनवन पण सध्या खदखदणाऱ्या काश्मीर खोऱ्यातल्या एका सामान्य घरातली मुलगी वयाच्या 15 व्या वर्षी तिला बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली आणि  दंगल सिनेमातून ती घराघरात पोहोचली. त्या मुलीचं नाव आहे झायरा वसीम.

‘दंगल’ सिनेमात पहेलवानाच्या भुमिकेत पाहिलेली झायरा तिच्या खऱ्या आयुष्यात अगदी कश्मीरची कली आहे. एबीपी माझाच्या कट्ट्यावर दंगल गर्ल झायरानं दंगलमध्ये तिच्या निवडीचे खास किस्से सांगितले.

दंगलसाठी नेमकी निवड कशी झाली आणि तिथवरचा सगळा प्रवास तिनं यावेळी उलगडला. आपल्याला आजही अभिनय येत नाही. असंही तिनं यावेळी प्रांजळपणे कबूल केलं. मात्र, आमीर खाननं कशा पद्धतीनं आपल्याकडून अभिनय करुन घेतला हे देखील ती सांगयला विसरली नाही.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actress Zaira Wasim on Majha Katta
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV