पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

विरोधकांना कोणतीही संधी न देता शिवसेनेनं एकापाठोपाठ एक अशा चाली खेळण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं मुंबई महापालिकेच्या राजकारणात मास्टरस्ट्रोक मारला आहे. या सर्व घडामोडींना वेग आलेला असताना शिवसेनेनं तात्काळ दुसरी खेळीही खेळली आहे.

मनसेच्या सहा नगरसेवकांकडे संमती पत्र असल्याचा दावा शिवसेनेनं कोकण आयुक्तांसमोर केला आहे. तसेच या 6 नगरसेवकांचा नवा गटही स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आता हा गट शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं समजतं आहे.

विरोधकांना कोणतीही संधी न देता शिवसेनेनं एकापाठोपाठ एक अशा चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेत बराच गोंधळ उडाला आहे तर भाजपही दोन पावलं मागे गेली आहे.

मनसेकडून नगरसेवकांना कोणतंही संमतीपत्र नाही : संदीप देशपांडे

‘मनसेकडून कोणत्याही नगरसेवकांना संमतीपत्र देण्यात आलेलं नाही. तसेच कोकण आयुक्तांना याबाबत एक मेलही पाठवण्यात आलेला आहे. सहा नगरसेवकांचा गट स्थापन करण्याआधी आमच्याशी चर्चा करण्यात यावी असं पत्र आम्ही कोकण आयुक्तांना दिलं आहे. यासोबतच आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही केली आहे.’ अशी माहिती मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.

हे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.

काल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच बंद दाराआड सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.

संबंधित बातम्या :

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार

भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?

मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!

फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV