मुंबई मेट्रो 6 साठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार

2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यास 6.5 लाख प्रवासी दररोज या मार्गावरुन प्रवास करतील.

मुंबई मेट्रो 6 साठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार

मुंबई : एमएमआरडीएने मुंबई मेट्रो 6 साठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत (डीएमआरसी) करार केला आहे. स्वामी समर्थ नगर – जोगेश्वरी – विक्रोळी असा 14.5 किमीचा हा मार्ग आहे. 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यास 6.5 लाख प्रवासी दररोज या मार्गावरुन प्रवास करतील.

मेट्रो 6 च्या संपूर्ण कामाची अंमलबजावणी डीएमआरसीकडून होणार आहे. 5 हजार 490 कोटी रुपये या प्रकल्पाची एकूण किंमत आहे. या मार्गावर एकूण 13 स्थानकं असतील. मेट्रो 6 चा डेपो हा कांजुरमार्ग येथे उभारणं नियोजित आहे.

मेट्रो 6 मार्गावरील स्थानकं

स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमीन नगर, जेव्हीएलआर, श्याम नगर, महाकाली केव्ह्ज, सीप्झ व्हिलेज, साकी विहार रोड, राम बाग, पवई लेक, आयआयटी पवई, कांजुरमार्ग (प.), विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग

या प्रकल्पामुळे प्रवासाचा 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. शिवाय वाहतूक कोंडी कमी होण्यासही याचा फायदा होईल. लोखंडवाला, सीप्झ, आयआयटीच्या प्रवाशांना याचा विशेष फायदा होईल.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Agreement with Delhi Metro Rail Corp for Mumbai Metro 6
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV