यापुढे मुख्यमंत्र्यांना बोलावणार नाही: अजित पवार

"आमचं मुख्यमंत्र्यांसोबत भांडण नाही, कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जाणे ही आपली संस्कृती आहे"

Ajit Pawar on CM Devendra Fadnavis

मुंबई: यापुढे 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवणार नाही, असं अजित पवार यांनी जाहीर केलं.

यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवले होते. त्याबाबत विचारणा व्हायची. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं अजित पवार म्हणाले.

आमचं मुख्यमंत्र्यांसोबत भांडण नाही, कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जाणे ही आपली संस्कृती आहे, मात्र त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बोलावणार नाही, असं अजित पवारांनी नमूद केलं.

अनिकेत कोथळीची घटना दुर्दैवी

सांगली पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेची घटना सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी आहे. सरकारला पोलीसांवर अंकूश ठेवता येत नसेल तर जनतेने कोणाकडे पाहायचे, असा सवाल अजित पवारांनी केला.

या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहोचतात. एवढ्या टोकाला पोलीस कसे पोहचू शकतात. आपण कोणतेही प्रकरण दाबू शकतो हा गर्व पोलींसाना झाला आहे, त्याला दाबला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ajit Pawar on CM Devendra Fadnavis
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/11/2017 1.    मुंबईतील टोईंगमध्ये मोठा

डीएसकेंना मुंबई हायकोर्टाचा 23 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा
डीएसकेंना मुंबई हायकोर्टाचा 23 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी

टोईंगमध्ये मोठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS दराडेंशी लागेबंध : निरुपम
टोईंगमध्ये मोठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS दराडेंशी...

मुंबई : मुंबईतल्या टोईंगमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप मुंबई

समस्या सोडवता येत नाही, मग पगार कशाला घेता?: हायकोर्ट
समस्या सोडवता येत नाही, मग पगार कशाला घेता?: हायकोर्ट

मुंबई: सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवता येत नसतील, तर पगार कसला

'बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात'
'बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात'

मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर

यापुढे बीकेसीतील सरकारी कार्यालयात शिफ्टमध्ये काम!
यापुढे बीकेसीतील सरकारी कार्यालयात शिफ्टमध्ये काम!

मुंबई : मुंबई मेट्रो-2च्या कामामुळे आता सरकारी कार्यालयांमध्येही

बाळासाहेबांचा स्मृतीदिन, अभिवादनासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर
बाळासाहेबांचा स्मृतीदिन, अभिवादनासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन आहे.

…तर मुंबईचं वाळवंट होईल : मुंबई हायकोर्ट
…तर मुंबईचं वाळवंट होईल : मुंबई हायकोर्ट

मुंबई : तिवरांची कत्तल थांबवा, अन्यथा मुंबई आणि आसपासच्या

‘मेधा’ आता पश्चिम रेल्वेवर, मध्य रेल्वेवरुन ‘यू-टर्न’
‘मेधा’ आता पश्चिम रेल्वेवर, मध्य रेल्वेवरुन ‘यू-टर्न’

मुंबई : मध्य रेल्वेवर चार मेधा लोकल धावणार असल्याने आनंदत असलेल्या

VIDEO : नवी मुंबईत तरुणाची पोलिसाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
VIDEO : नवी मुंबईत तरुणाची पोलिसाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

नवी मुंबई : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना नवी